सामाजिक

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बिलोली व अर्धापूर येथे ‘देवाभाऊ कृषी माऊली’ सोहळ्याचे आयोजन

महिला शेतकऱ्यांना मोफत कृषी किट, माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक व तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार...

शब्बीर शेख

नांदेड  :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने ‘देवाभाऊ कृषी माऊली’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महिला शेतकऱ्यांना मोफत कृषी किटचे वितरण, माती परीक्षणाचे थेट प्रात्यक्षिक आणि आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदरील  कार्यक्रम  23 जुलै रोजी दुपारी 1 वाजता रुक्मिणी कॉम्प्लेक्स, नवीन बसस्थानक, बिलोली व अर्धापूर येथे होणार आहे.

महाराष्ट्र शासनाने महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राबविलेल्या धोरणांना बळ देत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला जात आहे. ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान मिळावे आणि त्या अधिक आत्मनिर्भर व्हाव्यात, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.या सोहळ्यात कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, स्थानिक कृषी अधिकारी आणि कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून माती परीक्षणाची प्रत्यक्ष माहिती देण्यात येणार आहे. तसेच सुपीकतेनुसार पिकांचे नियोजन कसे करावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यावेळी महिला शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक कापडी पिशवीमध्ये प्रगत भाजीपाला बियाणे, जैविक खते, शेती उपयोगी अवजारे (खुरपे, विळा) तसेच रात्रीच्या सुरक्षिततेसाठी टॉर्चचा समावेश असलेले ‘कृषी माऊली’ किट मोफत वितरित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. माधुरी रेवणवार या आधुनिक शेती, मृदा आरोग्य आणि महिला शेतकऱ्यांच्या प्रगतीविषयी विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रभारी प्रेरणा वरपूडकर, प्रेरणा कोटलावार (नगराध्यक्ष, कुंडलवाडी), अनिता चोंडीकर (जिल्हाध्यक्षा, भाजप महिला मोर्चा, नांदेड दक्षिण) व जि.प.माजी अध्यक्षा तथा भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तरच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा मंगाराणी ताई अंबुलगेकर,सहसंयोजिका मंगल स्वामी, सहसंयोजिका शततारका काटकडे यांनी आयोजित केलेल्या सोहळ्याचे अध्यक्ष भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीजयाताई चव्हाण व नांदेड उत्तरच्या प्रभारी प्रेरणा ताई वरपूडकर यांचेही उपस्थिती लाभणार आहे. . यांच्यासह नांदेड उत्तर भाजपचे पदाधिकारी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या उपक्रमाचे आयोजन डॉ.श्रुती यादवराव तुडमे,माजी प्रदेश सदस्य,भाजप युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्य यांनी केले असून, परिसरातील सर्व महिला शेतकरी भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

nanded updates

नांदेड अपडेट्स हे केवळ एक डिजिटल न्यूज पोर्टल नाही, तर नांदेड जिल्ह्याचा विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान माहितीचा स्रोत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!