सामाजिक

दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास कठोर कारवाई

भेसळ करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होणार; जिल्हास्तरीय पथकाकडून तपासणी मोहीम

  • नांदेड : जिल्ह्यातील दूध उत्पादक, विक्रेते, सहकारी व खासगी दुग्ध प्रकल्प, दुग्धजन्य पदार्थ उत्पादक तसेच संबंधित दुकानदारांची जिल्हास्तरीय पथकामार्फत तपासणी करण्यात येणार असून, तपासणीत भेसळ आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा (एफआयआर) दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष यांनी दिले आहेत.
    दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डॉ. रत्नदीप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली २ जून २०२६ रोजी दूध भेसळ प्रतिबंधक समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील भेसळीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली.
    समितीच्या माध्यमातून विशेष पथके तयार करून जिल्ह्यातील विविध दूध संकलन केंद्रे, दुग्ध प्रकल्प, विक्री केंद्रे आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान दूध व दुग्धजन्य पदार्थांचे नमुने घेऊन त्यांची गुणवत्ता आणि शुद्धता तपासली जाणार आहे.
    भेसळमुक्त व सुरक्षित अन्नपदार्थ नागरिकांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

nanded updates

नांदेड अपडेट्स हे केवळ एक डिजिटल न्यूज पोर्टल नाही, तर नांदेड जिल्ह्याचा विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान माहितीचा स्रोत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!