क्राइम

देगलूर पोलिसांची तत्पर कारवाई; तेलंगणातून अपहरण झालेल्या ६ वर्षीय अल्पवयीन मुलीची अवघ्या चार तासांत सुखरूप सुटका, आरोपी जेरबंद…

शब्बीर शेख
नांदेड : तेलंगणा राज्यातील मदनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण करण्यात आलेल्या एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलीची देगलूर पोलिसांनी अवघ्या चार तासात सुखरूप सुटका करीत आरोपीला अटक करुन मदनुर पोलीसांच्या हवाली केले. या जलद आणि धाडसी कारवाईबद्दल देगलुर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मदनूर पोलीस ठाण्यात ६ जुलै २०२६ रोजी दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्यातील आरोपी राजेंद्र गोविंद हरणे वय ४३, रा. हिप्परगा थडी, मंडळ मदनुर जि. कामारेड्डी ( तेलंगना ) याने एका सहा वर्षीय  अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी मदनुर पोलीस स्टेशन येथे राजेश हरणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील आरोपी हा देगलूरकडे पलायन केल्याची माहिती मदनुर पोलीसांना मिळाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मदनूर पोलिसांनी देगलूर पोलिसांशी तातडीने संपर्क साधून मदतीची विनंती केली होती.
 ७ जुलै रोजी देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यमोहण बोलमवाड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेशीत करुन रवाना केले. सदर पथकाने  शहर व परिसरात शोधमोहीम सुरू करुन तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे आरोपीचा माग काढत  देगलुर शहरातुन आरोपीला  ताब्यात घेत अवघ्या चार तासात सहा वर्षीय  अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली आणि आरोपीला  मदनूर पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहण, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुर्यमोहण बोलमवाड,  पोलीस अंमलदार किरणकुमार वाघमारे, मोहम्मद ईम्रान, शिवाजी आडबे, आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. देगलूर पोलिसांच्या या तत्पर आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका होऊन आरोपीला वेळेत अटक करण्यात यश आले आहे.

nanded updates

नांदेड अपडेट्स हे केवळ एक डिजिटल न्यूज पोर्टल नाही, तर नांदेड जिल्ह्याचा विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान माहितीचा स्रोत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!